शिक्षकांसाठी तालुकास्तरीय संगणक कार्यशाळा
शिक्षक मित्रांनो,
२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. कॉम्प्युटर हा तंत्रज्ञानाचा एक अप्रतिम अविष्कार आहे. आज आपणास प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटरचा वापर मोठ्याप्रमाणावर होतांना दिसतो. कॉम्प्युटर ही आज काळाची गरज आहे. कॉम्प्युटरच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ-सोपी झाली आहेत. पूर्वी ज्याला अक्षर कळत नसे त्यालाच निरक्षर म्हटले जायचे पण आज कॉम्प्युटरच्या युगात ज्याला कॉम्प्युटरचा वापर येत नाही त्याला निरक्षर समजले जाते. इतका कॉम्प्युटरचा प्रभाव वाढला आहे. आता शिक्षक सुद्धा कॉम्प्युटर इंटरनेट आणि तंत्रज्ञान यापासून दूर नाही राहू शकत.त्यामुळे विशेषतः प्राथमिक शिक्षकांनी हे संगणक तंत्रज्ञान जास्तीत जास्त अवगत करावे आणि आपल्या ज्ञानात भर घालावी.
आपण सर्वजण कॉम्प्युटरचे "User" तर असतोच, मात्र आपण दुसऱ्यांनी बनवलेले software, वेबसाईट वापरतो. आपण स्वतः सुद्धा ते बनवून संगणकाचे "Smart User" होऊ शकतो. कमीत कमी वेळेत , आनंददायी पध्दतीने संगणकाचा वापर कसा करता येईल. आजचा शिक्षक
कुठेही कमी नाही. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वत:ची व्यवसायिक
पात्रता वाढवून स्पर्धेच्या जगात टिकून राहतील तेच शिक्षक भविष्य घडवतील. शिक्षकांना बदलते तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे आहे त्यादृष्टीने
माळशिरस तालुक्यातील शिक्षकांना संगणक प्रशिक्षणासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे
ठरवले आहे.
तरी या कार्यशाळेस सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरा.
No comments:
Post a Comment